साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग २)
देवाची उपासना, आध्यात्मिक साधना व ती करत असताना होणारी अनुभूती ह्यांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून सांगणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध —————————————————————– अनादि अनंत काळापासून जगातील लाखो-करोडो लोक देवाची भक्ती करतात. देवळांत, मशिदींत किंवा चर्चमध्ये किंवा निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांत नित्यनेमाने हजेरी लावतात. तासन् तास मंत्रपठण करतात, नमाज पढतात; बाबा, बुवा, महाराजांच्या प्रवचनास जातात; पंढरीच्या वारीस जातात, भागवत कथा …